मतदारसंघातील थत्ते मैदान येथे चालू असलेल्या श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायणाचा समारोप महंत ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने झाला. या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या कीर्तनातून मार्गदर्शन व आशीर्वाद घेतला. भक्तजनांसाठी हा कीर्तन सोहळा आध्यात्मिक उंची गाठणारा ठरला आणि सर्व भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवात संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित भक्तांना धर्म, भक्ती, आणि जीवनाचे तत्वज्ञान यांचे मार्गदर्शन मिळाले. महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या किर्तनातील साध्या, पण प्रभावी विचारांनी सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला.