श्रीरामपूर शहरात शुभारंभ लेडीज , किड्स वेअर चे भव्य उद्घाटन.


INC SHRIRAMPUR
Photo

 

आज श्रीरामपूर शहरात 'शुभारंभ लेडीज & किड्स वेअर' या नवीन दालनाच्या उद्घाटन सोहळ्याला आमदार लहु कानडे यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. स्थानिक व्यापाऱ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, कानडे साहेबांनी या नव्या व्यवसायाच्या यशस्वीतेची कामना केली. या दालनामध्ये महिलांसाठी व मुलांसाठी विशेषतः आधुनिक आणि पारंपारिक वस्त्रसंग्रह उपलब्ध असून, श्रीरामपूर शहरातील खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. या प्रसंगी उपस्थित ग्राहकांनी आणि स्थानिक नागरिकांनी दालनाच्या आकर्षक वस्त्रसंग्रहाचे कौतुक केले.उद्घाटन सोहळ्यात शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थिती लावली. आमदार लहू  कानडे यांनी स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे आपल्या विकासाच्या धोरणाचे एक महत्त्वाचे अंग असल्याचे नमूद केले.