अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आमदार लहू कानडे यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व शाळा आणि कॉलेजांमध्ये एक अनोखी भेट दिली. लेखक आणि कवी असलेल्या कानडे साहेबांनी या प्रसंगी स्वलिखित पुस्तक आणि जनकार्य अहवाल भेट म्हणून शाळा व कॉलेजांच्या ग्रंथालयांना प्रदान केला. या विशेष कार्यक्रमाला मतदारसंघातील प्रमुख मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वाचनाच्या प्रेरणेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवून, लहू कानडे साहेबांनी वाचनाची सखोल गरज व्यक्त केली आणि विद्यार्थी व शिक्षकांनी वाचनसंस्कृती रुजवावी, असा संदेश दिला..