श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून मुठेवाडगाव येथे सुमारे 35 लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये 25 लाख रुपये निधीतून श्री संत तुळशीराम महाराज तीर्थक्षेत्र येथे सभा मंडपाचे बांधकाम आणि 10 लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमीचा विकास हे प्रमुख कामे हाती घेण्यात आली. या सोहळ्याला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांना पाठिंबा दर्शवला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे आमदार कानडे यांनी यावेळी सांगितले.