आज श्रीरामपूर शहरात महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद आणि लोयोला दिव्यवाणी चर्च यांच्या वतीने धर्मगुरूंचा सन्मान सोहळा संपन्न झाला. ऑल फास्टर फेलोशिप श्रीरामपूरच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून धर्मगुरूंचा सन्मान करण्यात आला व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना व्यसनमुक्तीचा महत्त्वपूर्ण संदेश देत, शिक्षणातील दोषांवर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी एकत्र येऊन सहनशीलतेने समाजातील आव्हानांना तोंड देण्याचा निर्धार व्यक्त केला.