"शोध आणि बोध (डॉ. शिवाजी काळे गौरवग्रंथ)" या डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ग्रामीण कथांचे महत्त्व आणि त्या माध्यमातून समाजाला मिळणारा बोध यावर विशेष भर देण्यात आला. डॉ. शिवाजी काळे यांच्या कार्याचा गौरव करणारा हा ग्रंथ ग्रामीण साहित्याच्या वाचनप्रेमींना नवीन विचारधारा आणि प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.