श्रीरामपूर तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता सुनील शिरसाठ (सिद्धार्थ नगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र आमदार लहू कानडे यांच्या हस्ते संगीता शिरसाठ यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत महिला काँग्रेसच्या संघटनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. संगीता शिरसाठ यांनी आपल्या पदाचा योग्य तो सन्मान राखत महिलांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.