श्रीरामपूर मतदारसंघातील टाकळीभान गावामध्ये आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नांतून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कामांत टाकळीभान मारुती मंदिर परिसरात स्ट्रीट लाइट बसवणे, टाकळीभान ते गणेश खिंड रस्त्याचे डांबरीकरण, कांबळे वस्ती ते तनपुरे वस्ती व टाकळीभान ते बेलपिंपळगाव रस्त्यांचे काम, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या दोन नवीन खोल्यांचा समावेश आहे. एकूण ४ कोटी २७ लक्ष रुपयांच्या या विकास प्रकल्पांचा शुभारंभ गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार लहू कानडे यांनी जनतेच्या सेवेसाठी आणि विकासाच्या वचनपूर्तीसाठी कायम तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.