श्रीरामपूर काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आणि युवक काँग्रेस समन्वयक पदांची नियुक्ती.


INC SHRIRAMPUR
Photo

 

श्रीरामपूर काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी दत्तनगर येथील रवींद्र गायकवाड आणि युवक काँग्रेस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ समन्वयक पदी श्री. सचिन ब्राह्मणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे साहेब यांच्या हस्ते या दोन्ही मान्यवरांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या नियुक्तीद्वारे काँग्रेस पक्षाच्या संघटनेला आणखी बळकटी मिळेल आणि कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत होईल अशी आशा आहे. आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व पक्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.