श्रीरामपूर शहरातील डावखर मंगल कार्यालय, गोंदवणी येथे आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला, जिथे आमदार लहू कानडे साहेबांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये भिल्ल समाजाच्या विकासासाठी विशेष आराखड्यास मान्यता मिळावी, यासाठी लहू कानडे यांनी सातत्याने आवाज उठविला होता. या लढ्यामुळे आदिवासी समाजात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे. श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाज आणि आदिवासी एल्गार महासभेच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. जवळपास ५००० पेक्षा अधिक आदिवासी महिला, पुरुष व विविध समाज घटक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाला ठाम पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. हा सोहळा केवळ सत्कार नव्हता, तर आदिवासी समाजाने लहू कानडे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करून, त्यांच्यासोबत भविष्यातही खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.