राहुरी तालुक्यात आमदार लहू कानडे साहेबांचा जनसंवाद दौरा आणि विकास कामांचा आढावा


INC SHRIRAMPUR
Photo

 

आमदार लहू कानडे साहेब यांनी राहुरी तालुक्यातील मांजरी, टाकळीमिया, देवळाली, आणि राहुरी फॅक्टरी या गावांना भेट देऊन जनसंवाद दौरा केला. या दौऱ्यात काँग्रेस कमिटी व सर्व बुथ कमिटी सदस्यांची बैठक घेऊन गावनिहाय यादी वाचून सर्वांना सूचना देण्यात आल्या. जनतेच्या विविध समस्यांचा आढावा घेत, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, विकासाच्या विविध कामांवर चर्चा करत त्या कामांची पाहणी करण्यात आली. या दौर्यात स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि मतदारसंघातील विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.